Skip to content

Miracle Tips For kes dat karnyasathi । केस दाट करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

February 4, 2025
kes dat karnyasathi

kes dat karnyasathi । केस दाट करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

kes dat karnyasathi

kes dat karnyasathi केस दाट करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

kes dat karnyasathi
kes dat karnyasathi
केस भाग 1 Hair Care
सुंदर दिसावं असं कोणाला वाटत नाही; या जगात प्रत्येकालाच आपण सुंदर दिसावं असं वाटतं असतं… काळा असो..वा गोरा.., जाड स्थूल असो अथवा सडपातळ.. अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत म्हणजे पार म्हातारपण…..सर्वांनाच आपण सुंदर दिसावं म्हणून खूप खटाटोप करत असतात.तथापि सौंदर्य हे आपल्या हातात नसून ती निसर्गानं दिलेली एक देणगीच आहे.
मानवाचं सौंदर्य हे रंग, रूप, देहबोली यावरून स्पष्ट होत असते. फक्त चेहरा सुंदर असून चालत नाही तर
चेहऱ्याच्या सौंदर्याबरोबरच केसांचे सौंदर्यही खूप महत्त्वाचे असते. काहींचे केस दाट,सरळ, मऊ, लांब तर काहींचे विरळ,छोटे, कुरळे आणि गुंडाळलेले असतात.
नैसर्गिकरित्या लांब, दाट आणि रेशमी केस असलेल्या मुलींकडे पाहून आपण नेहमी विचार करतो की अशा सुंदर केसांसाठी त्या काय करत असतील….?
केस लांब करण्यासाठी मुली काय करत नाहीत? यासाठी अनेकदा मुली बाजारात मिळणारी महागडी उत्पादनेही ट्राय करतात. पण त्यामुळे त्यांना काही विशेष फायदा होत नाही.
आज आम्ही gharguti upay या ब्लॉग वर तुम्हाला दोन प्रभावी गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे केस कमरेपर्यंत लांब होतील. यामुळे केसांना मुळापासून डोक्यापर्यंत पोषण मिळेल आणि केस चमकदार आणि लांब होतील. केसांच्या वाढीसाठी काही प्रभावी घरगुती उपाय जाणून घेऊयात.

kes dat karnyasathi अंडी, ऑलिव्ह ऑइल आणि मध:
अंडी लावल्याने केसांना आवश्यक पोषण मिळेल. तसेच तुमचे केस दाट आणि सुंदर होतील. यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा अंड्याचा हेअर मास्क बनवून लावा.ऑलिव्ह ऑइलने केसांना दररोज मसाज करा, यामुळे कोलेजनचे उत्पादन वाढते आणि केस मजबूत होतात. म्हणजे केसांना सर्व प्रकारचे पोषण मिळते आणि केस लांब आणि मुलायम होतात.
तयार करण्याची पद्धत:
अंड्याच्या हेअर मास्क तयार करण्यासाठी तुम्ही अंडी फोडून नंतर त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि एक चमचा मध घाला. हा हेअर मास्क मुळांसह केसांना लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी डोके धुवून घ्यावे. व्हिटॅमिनने समृद्ध अंडी केस लांब करण्यास देखील मदत करतील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा :जीवनशैली
kes dat karnyasathi कांद्याचा रस:
केस लांब करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील वापरू शकता. केसांच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. कांद्यामध्ये केस लांब करण्याचे गुणधर्म असतात. केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी कांद्याचा रस हा उत्तम घरगुती उपाय आहे. कांद्याच्या रसामध्ये सल्फरचे प्रमाण चांगले असते ज्यामुळे शरीरातील कोलेजन चे प्रमाण वाढते ज्यामुळे केस दाट होतात.
कांद्याचा रस केसांना लावणे खूप सोपे आहे. एका कापडात कांद्याचा रस काढावा. यानंतर कापूस किंवा बोटांच्या साहाय्याने डोक्यावर लावा. हे सुमारे 2 मिनिटे ठेवा आणि नंतर डोके धुवा. आठवड्यातून काही दिवस असे केल्याने तुम्हाला लांब केस मिळतील. तसेच तुमचे केसही चमकतील.
मेथीचा दाण्याचा हेअर पॅक:
मेथी दाणे केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात. यामध्ये ​​लोह आणि प्रोटीन असते. केस वाढवण्यासाठी दोन चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये एक चमचा खोबरेल तेल घाला. आता ही पेस्ट तुमच्या टाळूवर लावा आणि मसाज करा. लांब आणि दाट केसांसाठी हा हेअर पॅक आठवड्यातून दोनदा लावा.
नियमित पाणी पुरेसे प्या:
निरोगी केसांसाठी पुरेसे पाणी पिणे फार महत्वाचे आहे. यामुळे केसांना आर्द्रता मिळते आणि कोरडेपणा दूर होतो. याशिवाय केसांची नियमित निगा आणि योग्य प्रकारे धुण्याची काळजी घ्या, खूप गरम पाण्याने केस धुवू नका.
रासायनिक उत्पादने टाळा:
नैसर्गिक उत्पादने वापरा: रसायन युक्त उत्पादन यांचा अती वापर केल्यास केसांना हानी होण्याची शक्यता खूप जास्त असते .त्यामुळे chemical प्रॉडक्ट्स जास्त वापरू नका.त्याऐवजी नैसर्गिक उत्पादने निवडा.

​व्हिटॅमिन(C)सी भरपूर प्रमाणात असलेली फळे-आवळा, पेरू, संत्री, लिंबू इत्यादींमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे केसांची मजबुती वाढवते आणि केस गळणे थांबवते.व्हिटॅमिन सी देखील एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि केसांचे आरोग्य राखण्यास मदत करते. व्हिटॅमिन सीचे सेवन केल्याने केसांची रासायनिक रचना, कोलेजन उत्पादन आणि केसगळती कमी होण्यास मदत होते.विटॅमिन ए, सी, डी, आणि ई यासारखे विटॅमिन्स केसांसाठी आवश्यक आहेत. हिरव्या पालेभाज्या, फळे आणि भाज्यांमध्ये हे विटॅमिन्स मिळतात.तसेच लोह,जस्त,आणि सेलेनियम केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहेत. बदाम,अक्रोड,आणि बीजांमध्ये हे खनिजे असतात.kes dat karnyasathi ही  फळे आवर्जून खावे .
हीट स्टायलिंग(Heat Styling)टाळा:
ब्लो ड्रायर,स्ट्रेटनर,किंवा कर्लिंग आयर्न वापरताना सावधगिरी बाळगा. जास्त उष्णता केसांना नुकसान पोहोचवू शकते.

(Disclaimer : या लेखात kes dat karnyasathi hi माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून घरगुती उपाय  'gharguti upay ' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)