
डिहायड्रेशन: एक गंभीर आरोग्य समस्या

Dehydration In Marathi डिहायड्रेशन: एक गंभीर आरोग्य समस्या
आपल्या मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण सुमारे ६०ते ७ ० % असते. मात्र, हे प्रमाण वय, लिंग आणि राहणीमान यानुसार बदलते. हे पाणी शरीराच्या विविध क्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते – जसे की तापमान नियंत्रित करणे, अन्नाचे पचन, पोषकतत्त्वांचे वहन, व अपशिष्ट पदार्थांची बाहेर टाकणे . परंतु जेव्हा शरीरातून अधिक प्रमाणात पाणी बाहेर जाते आणि त्याची भरपाई होत नाही, तेव्हा ही स्थिती “डिहायड्रेशन” Dehydration म्हणून ओळखली जाते. ही एक गंभीर आरोग्य समस्या असून याकडे वेळेवर लक्ष दिले गेले नाही तर जीवघेणी ठरू शकते.तर आज आपण घरगुती उपाय या Blog वरील लेखात डिहायड्रेशन बद्दल माहिती जाणून घेऊ ..
डिहायड्रेशन म्हणजे काय? Dehydration In Marathi
डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याचे व इलेक्ट्रोलाइट्सचे (सोडियम, पोटॅशियम इत्यादी) प्रमाण कमी होणे. ही स्थिती विशेषतः उन्हाळ्यात, जास्त शारीरिक श्रम करताना किंवा पुरेसे पाणी न पिल्यामुळे उद्भवते. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोक यांना याचा धोका अधिक असतो.
डिहायड्रेशनची कारणे Dehydration In Marathi
१. अधिक घाम येणे: जास्त तापमानामुळे किंवा व्यायामामुळे शरीरातून जास्त प्रमाणात घाम येतो आणि त्यामुळे पाण्याची कमतरता होते.
२. उलटी किंवा जुलाब: यामुळे शरीरातील द्रव व इलेक्ट्रोलाइट्स गमावले जातात.
३. पुरेसे पाणी न पिणे: अनेकदा व्यस्त जीवनशैलीमुळे लोक पुरेसे पाणी घेत नाहीत.
४. ताप: शरीराचे तापमान वाढल्यावर पाण्याची गरज वाढते.
५. मधुमेह: मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये लघवीच्या प्रमाणात वाढ होते, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
डिहायड्रेशनची लक्षणे Dehydration In Marathi

डिहायड्रेशनची लक्षणे त्याच्या तीव्रतेनुसार वेगवेगळी असू शकतात:
- सतत तोंड कोरडे होणे .
- सारखे सारखे तहान लागणे .
- मूत्राचा रंग गडद पिवळा होणे .
- थकवा आणि अशक्तपणा जाणवणे .
- चक्कर येणे किंवा डोके दुखणे .
- त्वचा कोरडी आणि लवचिकता कमी होणे .
- लघवीचे प्रमाण खूप कमी होणे .
- ताप किंवा हृदयाचे ठोके वाढणे (गंभीर स्थितीत) .
- इतर पोस्टस वाचण्यासाठी : इथे क्लिक करा , cystitis in marathi
लहान मुलांमध्ये:
- सतत रडणे पण अश्रू न येणे .
- झोपाटलेपणा .
- कोरडे डायपर (५-६ तासांपेक्षा जास्त) .
डिहायड्रेशनचे परिणाम
Dehydration In Marathi
डिहायड्रेशन जर वेळीच ओळखले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात:
- उष्णाघात (Heatstroke)
- मूत्रपिंडाचे कार्य बिघडणे
- मेंदूवरील परिणाम (गोंधळ, भ्रम)
- झोपी जाणे किंवा कोमा.
डिहायड्रेशनचे उपचार आणि प्रतिबंध
डिहायड्रेशन टाळण्यासाठी आणि त्यावर उपचार करण्यासाठी खालील उपाय अवलंबले जाऊ शकतात:
घरगुती उपाय:
- पुरेसे पाणी प्या – दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे.
- ओआरएस (ORS) चा द्रावण – डायरिया किंवा उलट्या झाल्यास ओआरएसचे पाणी प्यावे.
- फळांचे रस आणि नारळ पाणी – मोसंबी, सफरचंद, काकडी यांचे रस प्यावेत. नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात.
- सुपाचे सेवन – डिहायड्रेशन झाल्यास हलके सूप प्यावे.
- Dehydration In Marathi
- जर डिहायड्रेशन गंभीर असेल, तर रुग्णालयात इंट्राव्हेनस (IV) फ्लुइड्स दिले जातात.
- जास्त वेळ व्यायाम केल्यावर जास्त पाणी प्यावे.
- उन्हाळ्यात थेट उन्हात जाणे टाळावे.
- मद्यपान आणि जास्त कॅफीन टाळावे.
- दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.
- उन्हात काम करताना टोपी, हलके व सुती आणि पांढरे कपडे घालावेत आणि भरपूर पाणी प्यावे.
- व्यायाम करताना दर १५-२० मिनिटांनी थोडेसे पाणी घ्यावे.
- लहान मुलांना व वृद्ध व्यक्तींना नियमित पाणी द्यावे.
- जल हेच जीवन आहे असे म्हणतात …म्हणून दररोज पुरेसे पाणी पिणे, पोषक आहार घेणे आणि उन्हाळ्यात अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. जर गंभीर लक्षणे दिसली, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.