Skip to content

हर्निया म्हणजे काय ? हर्निया कारणे ,लक्षणे आणि उपचार

February 12, 2025

हर्निया: कारणे, लक्षणे आणि उपचार

हर्निया हा आजार नक्की काय असतो, तसेच गेल्या काही वर्षांमध्ये अचानक तरुणांमध्ये हर्निया चा त्रास का वाढला आहे याची कारणं आपण जाणून घेणार आहोत.

हर्निया: कारणे, लक्षणे आणि उपचार
hernia

Hernia हर्निया म्हणजे काय ?

तर आपण आधी हर्निया कशाला म्हणतात ते पाहू. अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर आपल्या शरीरातल्या आतल्या भागात एखादा अवयव दुर्बल झालेल्या स्नायू तून किंवा उतींच्या  आवरणातून बाहेर ढकलला जातो, तेव्हा या स्थितीला हर्निया असं म्हणतात.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा :1. First Stage Cancer कर्करोगाच्या पहिल्या टप्प्याबद्दल माहिती आणि घरगुती उपाय

हर्निया हा एक सामान्य आरोग्य समस्या आहे ज्यामध्ये शरीराच्या अंतर्गत अवयव किंवा ऊती शरीराच्या भिंतीतून बाहेर येतात. हे सहसा पोटाच्या भागात होते, परंतु इतर भागांमध्ये देखील होऊ शकते. हर्नियमुळे  वेदना आणि अस्वस्थता होऊ शकते आणि काहीवेळा शस्त्रक्रिया आवश्यक असते.

हर्निया होण्याची,कारणे,लक्षणे आणि उपचार
हर्निया होण्याची,कारणे,लक्षणे आणि उपचार

 हर्नियाचे ( Hernia ) प्रकार-

हर्नियाचे मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:

  •   Inguinal hernia इन्गुइनल हर्निया:-

हा सर्वात सामान्य प्रकार आहे जो पुरुषांमध्ये अधिक आढळतो. यामध्ये आतडे किंवा मेद ऊती पोटाच्या खालच्या भागातून बाहेर येते.

  •   Femoral hernia फेमोरल हर्निया:-

हा प्रकार स्त्रियांमध्ये अधिक आढळतो. यामध्ये फेमोरल नसांमधून आतडे बाहेर येते.

  •  Umbilical hernia अंबिलिकल हर्निया:-

अम्ब्लिकल हा प्रकार पोटावर आपल्या नाभी जवळ होताना दिसतो. हा प्रकार बाळाला जन्मतः असू शकतो किंवा प्रौढ व्यक्तींनी पोटावर ताण दिल्या सही होऊ शकतो.

hernia
हर्निया होण्याची,कारणे,लक्षणे आणि उपचार
  •  Hiatal hernia हाय टल हर्निया:-

यामध्ये पोटाचा वरचा भाग छातीच्या पोकळीत प्रवेश करतो.

  •   Incisional hernia इन्सिजनल हर्निया:-

हा प्रकार शस्त्रक्रियेच्या जागी होतो जिथे शरीराची भिंत कमकुवत होते.

  •    हर्नीयाची कारणे (Causes of Hernia)

 हर्नीयाची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

  •   आनुवंशिक :- रक्ताच्या नात्यात जर कोणाला आधी हर्निया चा त्रास असेल तर पुढे वंश परंपरागत पद्धतीने Hernia होऊ शकतो.
  •  Heavy weight जास्त वजन:-

मेदा मुळे पोटाच्या भिंतीवर दबाव वाढतो आणि हर्निया होण्याची शक्यता वाढते.

  •  Heavy lifting जास्त शारीरिक श्रम:-

जड वजन उचलणे किंवा जास्त शारीरिक श्रमा मुळे पोटाच्या भिंतीवर दबाव वाढतो.

  •   Chronic coughing or sneezing खोकला आणि कब्ज:-

दीर्घकाळ खोकला किंवा कब्ज असल्यास पोटाच्या भिंतीवर दबाव वाढतो.

  •  Smoking 🚬 धूम्रपान:-

धूम्रपानामुळे (टिश्यू) उती कमकुवत होतात आणि हर्निया होण्याची शक्यता वाढते.

 हर्नीयाची लक्षणे Symptoms of Hernia

हर्नीयाची मुख्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  •  उठलेला गाठ: हर्णीयाच्या ठिकाणी उठलेली गाठ दिसू शकते किंवा स्पर्श करता येऊ शकते.
  •  वेदना: हर्णीयाच्या ठिकाणी वेदना होऊ शकते, विशेषत: जेव्हा वजन उचलले जाते किंवा खोकला येतो.
  •  अस्वस्थता: हर्निया मुळे अस्वस्थता आणि जडपणा वाटू शकतो.
  •  उलट्या आणि मळमळ: काहीवेळा हर्निया मुळे  उलट्या आणि मळमळ होऊ शकते.
  •  जळजळ: हाय टल हर्निया मुळे  छातीत जळजळ होऊ शकते.

 हर्नियाचे निदान करण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करतात. काहीवेळा अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅन सारख्या चाचण्या करण्याची आवश्यकता असते.

हर्नियाचे उपचार Treatment of Hernia

  •   हर्नियाचे उपचार हर्नियाच्या  प्रकार आणि तीव्रता वर अवलंबून असतात. मुख्य घरगुती उपाय उपचार पद्धती पुढीलप्रमाणे आहेत:
  •  जीवनशैलीत बदल:

 योग्य आहार, व्यायाम, आणि जीवनशैलीमध्ये बदल करून हर्नियाच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येऊ शकते.नियमित व्यायाम करावे . विशेषत: पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी शरीराची हालचाल करा .

कोरफड :

पोटदुखी आणि ॲसिडिटीसाठी तुम्ही अनेकदा कोरफडीचा रस वापरला असेल. पण तुम्हाला माहित आहे का की, पोटात तयार होणाऱ्या ॲसिडमुळे हर्नियाचा त्रासही वाढू शकतो. त्यामुळे पोटाशी संबंधित विकारांपासून मुक्त होण्यासाठी कोरफडीचा रस जरूर घ्या. सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस प्यायल्याने हर्नियाच्या दुखण्यापासून खूप आराम मिळतो.

बर्फाने मालिश करणे :

हर्नियाचा त्रास असलेल्या व्यक्तीला पोटदुखी आणि पोटात सूज येण्याचा सामना करावा लागतो. याचा त्रास कमी होण्यासाठी वेदनादायक भागावर बर्फ लावावा. हे बर्फ पॅक तुमचे आकुंचन ट्रिगर वाढवू शकते. त्यामुळे हर्नियाच्या दुखण्यापासून खूप आराम मिळतो.

मुळा :

मुळा तुमची जठरासंबंधी जळजळ दूर करण्यात खूप मदत करते. यासाठी 1 कप पाण्यात मुळा टाकून चांगले उकळा. या मुळ्याचे रोज सेवन केल्याने हर्नियाच्या दुखण्यापासून खूप आराम मिळतो.

आले :

जर तुम्हाला हर्नियाच्या त्रासापासून सुटका करुन  घ्यायची असेल तर त्यासाठी आल्याचे सेवन करावे. आल्यामध्ये आढळणारे दाहक-विरोधी गुणधर्म आपली जळजळ दूर करण्याचे काम करतात. ज्यामुळे दुखण्यात खूप आराम मिळतो.

  •  औषधोपचार:

हायटल हर्नीया साठी ॲसिड कमी करणारी औषधे दिली जातात.

  •  शस्त्रक्रिया:

जर हर्निया मुळे  तीव्र वेदना किंवा गुंतागुंत होत असेल तर शस्त्रक्रिया आवश्यक असते. शस्त्रक्रिया मध्ये हर्निया च्या भागाला बळकट करण्यासाठी जाळी वापरली जाते.

अधिक पोस्ट्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जीवनशैली 

      जीवनशैली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यास हर्निया चा प्रभावीपणे सामना करता येतो. जर तुम्हाला हर्निया ची लक्षणे दिसत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.