Skip to content

सोशल मीडिया चे फायदे | सोशल मीडिया हे एक वरदान आहे |Social Media Che Fayade..

March 21, 2025
सोशल मीडिया चे फायदे

 

सोशल मीडिया चे फायदे| social media Che Fayade| www. ghargutiupay.com
www.ghargutiupay.com

सोशल मीडिया चे फायदे अनेक फायदे आहेत ..

अनेक लोक सोशल मीडियाचा वापर केवळ करमणुकीसाठी करतात, पण त्याचे अनेक फायदेही आहेत. शिक्षण, व्यवसाय, समाजसेवा, माहिती प्रसार आणि मनोरंजन यामध्ये सोशल मीडिया मोठी भूमिका बजावत आहे. आजकाल तर अनेक लोकं ही ONLINE EARNING करत आहेत. विशेष बाब म्हणजे ONLINE EARNING करणारे हे आता CLASS ONE OFFICERS पेक्षा काही कमी नाहीत…. महिन्याला सहज 60 ते 70 हजार कमावणारे खूप लोकं आहेत, ते सर्वजण या SOCIAL MEDIA चा पुरेपूर वापर करून घेतात…

सोशल मीडिया चे फायदे

सोशल मीडिया हा आधुनिक जगातील एक अविभाज्य भाग बनला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हाट्सअप, युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्म्समुळे आपली जगाशी संवाद साधण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. इंटरनेटच्या क्रांतीनंतर सोशल मीडियाने संपूर्ण जगाला एका ठिकाणी आणले आहे. २ ० ० २ साली म्हणजे सुमारे २ ० – २ ५ वर्षांपूर्वी धीरूभाई अंबानी यांनी ‘कर लो दुनिया मुट्ठी में’ या स्लोगन द्वारे टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला होता , तो आता पूर्णपणे सत्यात उतरलेलं आहे .

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, यूट्यूब यांसारख्या प्लॅटफॉर्म्समुळे लोक एकमेकांशी सहज जोडले जातात. तर आज घरगुती उपाय या Blog वरील या लेखात सोशल मीडिया चे फायदे याबद्दल अधिक माहिती पाहू ….

१ ). शिक्षणासाठी उपयुक्त माध्यम । सोशल मीडिया चे फायदे

आजच्या काळात सोशल मीडिया हे विद्यार्थ्यांसाठी खूप प्रभावी आणि उपयुक्त साधन ठरले आहे. ऑनलाईन शिक्षण, ई-बुक्स, व्हिडीओ लेक्चर्स, वेबिनार्स यामुळे शिक्षण अधिक सुलभ झाले आहे. यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर मोफत शिक्षण उपलब्ध असून, विविध अभ्यासक्रम, कौशल्यविकास यासंबंधी व्हिडीओज पाहता येतात. त्यामुळे सोशल मीडिया हे विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरते.

Youtube बघून थोडं जरी टेक्निकल knowledge वाला माणूस सहज व्यवसाय आणि धंदा सुरू करु शकता .

उदाहरण : छोटे मोठे उपकरणं दुरुस्ती आणि पुनर्रचना करणे, motor rewind करणे,photo आणि व्हिडिओज एडिटिंग करणे ई…..

२ ). रोजगाराच्या संधी उपलब्ध

सोशल मीडियामुळे अनेकांना घरबसल्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. यूट्यूब, ब्लॉगिंग, फ्रीलान्सिंग, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या माध्यमातून लोक पैसे कमावू लागले आहेत. अनेक कंपन्या ऑनलाईन नोकऱ्या देत आहेत, जिथे घरून काम करता येते. त्यामुळे सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास उत्तम करिअर घडवता येऊ शकते. ऑनलाईन work करणारे अनेक मान्यवरही आहेत.

इतर पोस्ट वाचण्यासाठी: Barefoot Walking Benefits in Marathi । अनवाणी पायांनी चालण्याचे फायदे

३ ). माहितीचा झपाट्याने प्रसार

सोशल मीडियामुळे कोणतीही माहिती काही सेकंदात संपूर्ण जगभर पोहोचू शकते. आपल्याला देश-विदेशातील घडामोडी त्वरित कळू शकतात. ब्रेकिंग न्यूज, आरोग्यविषयक माहिती जसे की घरगुती उपाय, पाक कला, मेहंदी आणि रांगोळी काढणे,हवामान अंदाज, सरकारी योजना यांसारखी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज उपलब्ध होते. यामुळे नागरिक अधिक जागरूक होतात. सोशल मीडिया मुळे नागरिक एकमेकाशी Connected राहतात.

सोशल मीडिया चे फायदे

४ ). व्यवसाय वाढीस चालना । सोशल मीडिया चे फायदे

सोशल मीडिया हे व्यवसाय आणि उद्योग वाढवण्यासाठी एक प्रभावी साधन बनले आहे. लहान व्यवसाय असो किंवा मोठी कंपनी, सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्यास उत्पादनांची जाहिरात मोठ्या प्रमाणात केली जाऊ शकते. अगदी कमीत कमी वेळात सोशल मीडिया चे फायदे / वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे platform फार उपयुक्त साधन आहे.फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून व्यवसायांची जाहिरात करता येते, ग्राहकांशी थेट संवाद साधता येतो आणि ब्रँडची लोकप्रियता वाढवता येते.ग्राहकांशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजा समजून घेणे शक्य होते. डिजिटल मार्केटिंगद्वारे कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहोचता येते.

ऑनलाइन विक्रीसाठी सामाजिक माध्यमे एक उत्तम व्यासपीठ ठरतात. अमेझॉन, Flipkart, Zomato,swiggy ई सोशल नेटवर्क वर चालतात.

५ ). लोकांशी जोडण्याचे माध्यम । सोशल मीडिया चे फायदे

आजच्या धावपळीच्या जीवनात दूर असलेल्या कुटुंबीयांशी आणि मित्र-परिवाराशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया खूप महत्त्वाचे ठरले आहे. What’s app, Face book इंस्टाग्राम यांसारख्या सामाजिक माध्यम मुळे लोक सहज एकमेकांशी संवाद साधू शकतात. व्हिडीओ कॉलिंग, मेसेजिंग आणि ग्रुप चॅट यामुळे लोकांमधील अंतर कमी झाले आहे.

अश्या अनेक फायदे सांगता येतील.

६ ). वैचारिक अभिव्यक्तीचे साधन

सोशल मीडियामुळे प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळते. लोक आपले विचार, अनुभव, लेखन, कविता, छायाचित्रे इत्यादी पोस्ट करून जगासोबत शेअर करू शकतात. तसेच, विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा घडवून आणता येते.सामाजिक माध्यमांद्वारे आपण आपली मते आणि विचार व्यक्त करू शकतो. ब्लॉग, व्हिडिओ आणि पोस्टद्वारे आपण आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आपल्या आवडीच्या विषयांवर चर्चा करून आपण इतरांशी संवाद साधू शकतो.

 

७ ). आरोग्यविषयक जागरूकता

सोशल मीडियावर डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञ आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती शेअर करतात. योग्य आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य, आजारांवरील उपाय अशा अनेक गोष्टींबाबत जागरूकता निर्माण होते. विशेषतः कोरोनासारख्या महामारीत सोशल मीडियाने आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती प्रसारित करण्यात मोठी भूमिका बजावली.

८ ). मनोरंजनाचे साधन

सोशल मीडियावर भरपूर मनोरंजनाचे पर्याय उपलब्ध आहेत. चित्रपट, संगीत, विनोदी व्हिडीओ, वेब सिरीज, गेम्स इत्यादीमुळे लोकांना तणावमुक्त होण्यास मदत होते. त्याचबरोबर कलाकार आणि नवीन टॅलेंट असलेल्या लोकांसाठी सोशल मीडिया एक उत्तम व्यासपीठ ठरले आहे.

या प्रकारे सोशल मीडिया अनेक चे फायदे आपल्याला सांगता येईल .