Skip to content

योग: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी अमूल्य साधन

January 30, 2025
योग आणि व्यायाम

योग: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी अमूल्य साधन

योग

१. योगाचा इतिहास आणि महत्त्व

योग ही भारताची अतिशय प्राचीन अशी परंपरा असून, ती शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. योगाची उत्पत्ती सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी झाली असून, पतंजली ऋषींनी योगसूत्रांद्वारे त्याचा विस्तार केला. महर्षी पतंजलींनी अष्टांग योगाची महिमा सांगितली, आरोग्यदायी जीवनासाठी हे महत्वपूर्ण आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनात योग हे केवळ एक शारीरिक व्यायाम नाही, तर तो मनःशांती आणि एकाग्रता वाढवण्याचे प्रभावी साधन आहे ,असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही .उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असे महात्मा गांधीजी यांनी सांगितले आहे .

योगची व्याख्या: योग ही मूलत: अतिशय सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक पद्धत आहे. मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे . निरोगी जीवन जगण्याची ही कला आणि शास्त्र आहे. ‘योग’ हा शब्द संस्कृत मूळ ‘युज’ पासून आला आहे, याचा अर्थ ‘सामिल होणे’ किंवा ‘एकत्र होणे’ असा होतो.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा :जीवनशैली

योगाच्या माध्यमातून शरीर आणि मन यांच्यात समतोल राखता येतो. श्वासावर नियंत्रण ठेवणे, शरीराला ताण देऊन विश्रांती देणे, तसेच ध्यानधारणा करणे या प्रक्रियांमुळे जीवनशैली सुधारते. योग हे तणावमुक्त जीवनासाठी प्रभावी साधन मानले जाते आणि त्यामुळे आजच्या आधुनिक जीवनशैलीत त्याचे महत्त्व वाढले आहे.

योग हिन्दू धर्माच्या 6 दर्शनांपैकी एक आहे. परंतु याचा धर्माशी काहीही संबंध नाही. योगाचे ध्यानाने संयोजन होते. बौद्ध धर्मातही ध्यानासाठी याला महत्त्व आहे आणि ध्यानाचा संबंध इस्लाम तसेच ख्रिश्चन धर्मासोबतही आहे.

२. योगाचे फायदे

योगाचे शरीर आणि मनावर अनेक सकारात्मक परिणाम होतात. नियमित योगाभ्यास केल्याने खालील फायदे होतात:

शारीरिक फायदे:

योग
  1. रोगप्रतिकारशक्ती वाढते: नियमित योग केल्यास आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, ज्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते आणि आजार दूर राहतात.
  2. पचनक्रिया सुधारते: काही योगासने पचनसंस्थेसाठी उपयुक्त असून, अपचन, गॅस आणि अ‍ॅसिडिटी यांसारख्या समस्या दूर होतात.
  3. ताणतणाव कमी होतो: योगामध्ये ध्यान आणि श्वसन तंत्रांचा समावेश असल्याने तणाव कमी होतो.
  4. रक्ताभिसरण सुधारते: नियमित योगामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदय निरोगी राहते.
  5. लवचिकता वाढते: नियमित योगासने केल्याने शरीर लवचिक आणि तंदुरुस्त राहते.

मानसिक फायदे:

yoga
योग
  1. नकारात्मक विचार दूर होतात: नियमित ध्यान केल्याने मनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो.
  2. एकाग्रता वाढते: योगामुळे विचारकरण्याची शक्ती वाढते आणि मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते , त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.
  3. आत्मविश्वास वाढतो: योगामुळे आत्मभान जागृत होते आणि आत्मविश्वास वाढतो.
  4. मनःशांती मिळते: ध्यान आणि श्वसन नियंत्रणामुळे मानसिक शांतता मिळते आणि तणाव दूर होतो, परिणामी आपले जीवन अधिक सुखकर आणि समृध्द होण्यास मदत होते .

योगासंबंधी मराठी पुस्तके

  1. योग आणि मन (डॉ. संप्रसाद विनोद)
  2. योग एक कल्पतरू (बी.के.एस. अय्यंगार)
  3. योग एक जीवनशैली (अनिल सरोदे)
  4. योग एक जीवनशैली (डॉ. नंदकुमार गोळे)
  5. योगरहस्यम् (वासुदेवानंद सरस्वती)
  6. योग विज्ञान (डॉ. उल्हास कोल्हटकर)
  7. योग सर्वांसाठी (बी.के.एस. अय्यंगार)
  8. राजयोग (स्वामी विवेकानंद)

योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून, तो एक जीवनशैली आहे. योग केल्याने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य सुधारते. त्यामुळे रोजच्या जीवनात योगाचा समावेश करावा आणि तंदुरुस्त, तणावरहित व आनंदी जीवन जगावे.