
जीवनशैली
प्राचीन काळापासून चालत आलेली जीवनशैली आणि आत्ताच्या घडीला आहे ती जीवनशैली यात खूप तफावत आहे.जीवनशैली म्हणजे आजच्या काळातील Lifestyle….! सकाळी ऊठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे जे केले जाते , करावे लागते ते सर्व जीवनशैलीमधे अंतर्भूत आहे. आपला पेहराव , विविध सण किंवा उत्सव ,एकमेकांशी वागणूक , कुटुंबपद्धती, शिक्षण , संस्कार आणि आपण मॕनर्स म्हणतो ते देखील जीवनशैलीत येते.

जुनी आणि नवीन जीवनशैली: एका काळातील बदल
जीवनशैली म्हणजेच आपल्या दैनंदिन जीवनातील विविध प्रसंग ,समाजात एकमेकांशी च व्यवहार , सवयी, आणि परंपरांचा संच. मागील काही दशके आपण या जीवनशैलीत मोठे बदल होताना पाहिले आहेत. विषेशःत १ ९ ८ ० ते १ ९ ९ ० ची पिढी ….कारण या दशकात सामाजिक ,आर्थिकआणि राजकीय जीवनात मोठे बदल आपल्याला पाहायला मिळालं आहे .
जुनी जीवनशैली आणि नवीन जीवनशैली यांच्या तुलनेत काही महत्त्वाचे फरक दिसून येतात. पूर्वीच्या काळातील साधे जीवनमान , शेतकरी जीवन आणि आजच्या आधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलीमध्ये खूपच बदल झाला आहे.
जुनी जीवनशैली

पूर्वीची जीवनशैली साधी आणि नैतिक होती. ग्रामीण भागात लोकांची जीवनशैली शेतकरी, शेतमजूर, आणि कुटुंबाच्या विविध कामकाजावर आधारित होती. लोकांना परंपरांच्या धर्तीवर काम करणे, एकमेकांना मदत करणे, आणि एकत्र कुटुंबात राहणे यावर विश्वास होता.समाजातील प्रत्येक सण ,उत्सव समाजातील संबंध जास्त दृढ आणि व्यक्तिसंवेदनशील होते. घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांच्या मदतीला हजर असायचा.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : रक्तदाब । High Blood Pressure
तसेच, त्या काळी आहार आणि शारीरिक कार्यक्षमता यावर अधिक लक्ष दिलं जात होतं. घरी बनवलेले शुद्ध आणि पौष्टिक अन्नच प्राधान्य घेतले जात होते. शारीरिक श्रमही रोजच्या दिनक्रमाचा भाग होता. घरे साधी असली तरीही शंभर टक्के नैसर्गिक वस्त्र, अन्न, आणि उत्पादने वापरण्याची प्रथा होती.

नवीन जीवनशैली
आजकालच्या जीवनशैलीतील सर्वात मोठा बदल म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभाव…. स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया, आणि विविध डिजिटल गॅजेट्स यांच्या मदतीने जीवन अधिक गतिमान आणि कार्यक्षम बनले आहे.
कामाच्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर त्वरित आणि अधिक प्रभावी पद्धतीने होऊ लागला आहे. घराघरात एलईडी टीव्ही, मोबाईल ,लॅपटॉप, आणि इंटरनेट कनेक्शन हे आजच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले आहेत. घरबसल्या एकमेकांशी संवाद साधता येतो, ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते, आणि कामाच्या ठिकाणी उत्पादकता अधिक प्रमाणात वाढवता येते.
आहारातही मोठा बदल झाला आहे. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान विकसित झालेली नव्हती. त्याकरणाने जे काही उत्पादन होत होते त्यात कुठल्याच प्रकारचा भेसळ नसत. परिणामी लोकांचे आरोग्य आणि जीवन समृध्द होता.
पूर्वी घरच्या घरी तयार केलेले साधे आणि पौष्टिक अन्न खाल्ले जात होते, परंतु आता बाहेरचा फास्ट फूड आणि प्रोसेस्ड अन्न खाण्याची प्रथा वाढली आहे. जरी आहाराच्या बाबतीत काही प्रमाणात सुविधा झाली असली तरी त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय…
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य
पूर्वीच्या काळी शारीरिक श्रम हे जीवनाचे महत्त्वाचे अंग होते. लोक शेती, घरकाम, शाळा व इतर कष्टाचे काम करत होते. त्यामुळे शारीरिक फिटनेस कधीही ताणतणावाच्या स्थितीत नव्हता.
परंतु आता ऑफिस कार्य, बैठ्या कामांची संख्या वाढली आहे. यामुळे शारीरिक आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मानसिक ताण आणि चिंता देखील वाढली आहे. त्यामुळेच आत्ताच्या नवीन जीवनशैलीमध्ये मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी व्यायाम ,योग, ध्यान, जिम आणि वर्कआउट यांना प्राधान्य देण्याची जागरूकता निर्माण झाली आहे.
सामाजिक संबंध
पूर्वीचे सामाजिक जीवन अधिक कुटुंबप्रधान होते. मोठ्या कुटुंबातील सदस्य एकत्र राहत, एकमेकांच्या आनंदात सामील होण्याचा आणि शोकात एकत्र बसून सांत्वन करण्याचा प्रवृत्ती होती. परंतु आजकालच्या आयुष्यात लोकांचे सामाजिक संबंध लहान, खूप व्यावसायिक आणि जास्त आंतरजालावर आधारित झाले आहेत. फक्त फेसबुक, इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सऍपवरच संपर्क राखला जातो, वास्तविक भेटी आणि संवाद कमी झाले आहेत.
निष्कर्ष
जुनी आणि नवीन जीवनशैलीमध्ये अनेक फरक आहेत. पूर्वी साधे, शांतीपूर्ण आणि नैतिक जीवन होते, तर आजच्या जीवनशैलीत तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि वेगवान जीवनपद्धती आहे. परंतु त्यामध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे जीवनातील संतुलन, आरोग्य आणि आपुलकीची भावना.
प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनशैलीत ताजेतवानेपणा आणि मानसिक शांती मिळवण्याचे महत्व आहे. जुने आणि नवीन जीवनशैली एकमेकांच्या पूरक आहेत, आणि दोन्ही एकमेकांतून शिकून जीवन अधिक उत्तम बनवता येते.
याचाच अर्थ वरवर आपण बदललो आहोत – जीवनपद्धती बदलली आहे पण आपली भारतीय जीवनशैली अजूनतरी सांभाळतो आहोत. निरोगी आणि यशस्वी जीवनासाठी हेल्दी लाइफस्टाईल असावी असं सगळे सांगतात. आपण ते ऐकतही असतो. पण हेल्दी जगायचं म्हणजे फक्त नियमीत व्यायम आणि आहार एवढेच असते का……….? तर नाही… !
आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी अजून बऱ्याच गोष्टींचा अवलंब करणं आवश्यक असतं….! त्याबद्दल अधिक माहितीचा खजिना पुढच्या लेखात …………