
केस गळती थांबवण्यासाठी सोपे उपाय – Hair Care । Hair Fall
आयुर्वेदामध्ये आहार आणि जीवनशैली हे दोन प्रमुख घटक आहेत जे आपल्या शरीराच्या आणि केसांच्या आरोग्यावर परिणाम करतात. अनियमित आहाराच्या सवयी, खाण्याच्या चुकीच्या सवयी, रोग, जीवनसत्त्वे (Vitamins) किंवा खनिजांची (Minerals) कमतरता केसांच्या गुणवत्तेवर परिणाम करते आणि कोंडा, लवकर टक्कल पडणे आणि केस अकाली पांढरे होणे यासारख्या समस्या निर्माण करतात.

प्रत्येक व्यक्तीला आपल्या केसांची निगा आणि योग्य देखभाल करण्याची आवश्यकता असते, जेणेकरून ते निरोगी, मजबूत आणि सुंदर दिसतात.त्यासाठी आज आपण ghargutiupay या Blog च्या लेखात आपण मानवी केसांची संरचना, विविध प्रकार आणि त्यांची योग्य काळजी कशी घ्यावी यावर चर्चा करणार आहोत. प्रस्तुत article मधील माहिती तुमच्यासाठी नक्कीच लाभदायक ठरेल याची आम्हाला शाश्वती आहे.
केस गळती हे एक अत्यंत सामान्य समस्या आहे,त्याचा सामना बहुतेक खूप जणांना करावा लागतो .मग कमी वयातच टक्कल पडल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि ते मानसिकदृष्ट्या त्रस्त होऊ लागतात . काही प्रमाणात केस गळणे नैसर्गिक असले तरी, ते वाढल्यास आणि गंभीर रूप घेतल्यास, ते एक चिंता विषय ठरू शकते.
केस गळण्याचे कारणे
केस गळण्याची खूप कारणे आहेत .
काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे:
केस हा आपल्या मानवी शरीराचे एक महत्वपूर्ण आणि अविभाज्य घटक आहे .केसाला आपल्या सौंदर्याचे, व्यक्तिमत्त्वाचे आणि शरीराच्या आरोग्याचे द्योतक मानले जातात. केसांचा उपयोग केवळ सौंदर्यवर्धनासाठीच नाही, तर ते आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी , तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आपल्या मानसिक स्थितीचे प्रतीक आहे .केस अधिक सुंदर करण्याच्या नादात आपण अनेकदा चुकीच्या गोष्टी करतो त्यामुळे आपले हे केस खराब होतात. मग खराब झालेले केस नाजूक असतात, त्यामुळे ते तुटण्याची प्रवृत्ती असते.
१ ) जेनेटिक्स (आनुवंशिकता):
आनुवंशिक कारणांमुळे काही लोकांना लहानपणी म्हणजेच वयाच्या १ ६ ते १ ८ वर्षांपासून किंवा प्रौढ वयात केस गळण्यास सुरु होऊ शकते. याला अँड्रोजनिटिक अलोपेसिया असेही म्हटले जाते.

२ ) असंतुलित आहारशैली :
कधी कधी शरीराला आवश्यक पोषणतत्त्वांची कमतरता असल्यास, केस गळणे सुरू होऊ शकते. विशेषतः, प्रोटीन, आयर्न, आणि व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे केस गळण्याचा धोका वाढतो.कर्बोदके तसेच प्रथिने, खनिजे आणि निरोगी चरबीयुक्त संतुलित, नियमित आहार घेतल्यास केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. निरोगी केसांसाठी आवळा, तीळ, तूप, खजूर आणि मनुका यांचा रोजच्या आहाराचा भाग असावा. जास्त गोड आणि खारट पदार्थांपासून दूर रहा कारण ते जळजळ करतात ज्यामुळे केस गळतात.
२ ) हार्मोनल बदल:
गर्भधारणे, मासिक पाळी, मेनोपॉज, किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) यांसारख्या हार्मोनल बदलांमुळे देखील केस गळू शकतात.

३ ) मानसिक ताणतणाव:
सतत तणावाखाली राहिल्याने केस गळणे, अकाली पांढरे होणे, कोरडे, निस्तेज आणि निर्जीव केस होऊ शकतात. ब्राह्मी, मंडुकपानी, अश्वगंधा किंवा जटामांसी यापैकी कोणत्याही औषधी वनस्पतींनी समृद्ध केलेला चहा तणावाचा सामना करण्याच्या नैसर्गिक क्षमतेस समर्थन देतो. थोडी विश्रांती आवश्यक आहे आणि योग आणि ध्यानाचा सराव केल्याने ताण आणि तणाव कमी होण्यास मदत होते. औषधी हर्बल तेलांनी स्कॅल्प मसाज केल्याने मानसिक आराम मिळतो आणि मानसिक स्वास्थ चांगले राहण्यास मदत होते .
४ ) औषधांचा दुष्परिणाम:
काही औषधांचे Side Effects झाल्याने देखील केस गळू शकतात. उदाहरणार्थ :कर्करोगाच्या उपचारांमध्ये रसायनिक थेरपीचा वापर केला जातो. रसायनांचा शरीरावर वाईट प्रभाव होतो आणि यामुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो. केमोथेरपीच्या दरम्यान, बर्याच लोकांना पूर्णपणे टक्कल पडलेले आपण पहिला असाल ….. मात्र, हे उपचार थांबविल्यानंतर केस पुन्हा उगवू शकतात.
५ ) प्रदूषण आणि हानिकारक रासायनिक उत्पादने:
प्रदूषण आणि रासायनिक शॅम्पू, कंडीशनर, हेअर डाईज यांचा अति वापर केल्यास केसांचे नुकसान होऊ शकते.
६ ) विटॅमिन A चे अतिरेक (Excess of Vitamin A):
विटॅमिन A शरीरासाठी आवश्यक आहे, पण त्याची जास्त मात्रा घेतल्यास केस गळण्याचे कारण होऊ शकते. काही प्रिस्क्रिप्शन मेडिसिनमध्ये आणि सप्लिमेंट्समध्ये विटॅमिन A चे अतिरेक असू शकते, ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे .
७ ) डायबेटीस औषधे (Diabetes Medications):
डायबेटीससाठी वापरल्या जाणार्या काही औषधांमध्ये केस गळण्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. या औषधांमुळे शरीरातील रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होतो, आणि हे केस गळण्याचे कारण ठरू शकते.
केस गळण्याचे लक्षणे
१ ) प्रत्येक वेळी जास्त केस गळणे
विशेषत: स्नान करताना किंवा केस सुलभ करत असताना सामान्यपेक्षा जास्त केस गळल्यास ते एक गंभीर लक्षण ठरू शकते.
२ ) पोकळ ठिकाणी केस गळणे
काही लोकांना एकाच ठिकाणी खूप केस गळलेली असतात . याला अँड्रोजनिटिक अलोपेसिया म्हणतात.
३ ) पातळ होत चाललेले केस
केस जाड आणि घनदाट असले तरी, काही वर्षांनी हळूहळू त्यांची घनता कमी होते किंवा पातळ होतात , हा देखील केस गळण्याचा लक्षण असू शकतो.
केस गळतीसाठी आहार उपाय
१ ) आहारात सुधारणा
केसांची गुणवत्ता आणि वाढ सुधारण्यासाठी प्रोटीन, आयर्न, आणि व्हिटॅमिन्ससारख्या पोषणतत्त्वांचा समावेश करा. ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स आणि विटॅमिन D देखील केसांसाठी फायदेशीर ठरतात.जेवण हवेशीर, शांत खोलीत घ्यावे आणि जेवताना इतर कोणतेही काम करू नये. चांगल्या पचनासाठी, जेवताना जास्त पाणी पिऊ नका. जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावे. तेलकट, मसालेदार किंवा मांसाहारानंतर कोमट पाणी प्या.
या नियमांचे पालन करून तुम्ही तुमच्या शरीरात अमा (विष) तयार होण्यापासून रोखू शकता. विषारी पदार्थ आपल्या शरीरातील पेशी आणि ऊतींपर्यंत पोषक घटक पोहोचण्यास प्रतिबंध करतात, म्हणून चहा, कॉफी, अल्कोहोल, मांस आणि धूम्रपान यांच्या अतिसेवनाच्या सवयी बंद केल्या पाहिजेत. तळलेले, मसालेदार, आंबट आणि आम्लयुक्त पदार्थ हानिकारक असतात. रासायनिक किंवा कृत्रिम औषधे टाळा. त्यामुळे आपल्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
२ ) तनावाचे नियंत्रण
योग, ध्यान आणि प्राणायामाचे नियमित सराव करून मानसिक ताणतणाव कमी करा. हे केस गळतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.
३ ) प्राकृतिक तेलांचा वापर
नारळ तेल, बदाम तेल, आणि आळणी तेल या नैसर्गिक तेलांचा नियमितपणे वापर केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस गळती कमी होते.तीळ, नारळ किंवा बदाम यांसारख्या तेलांनी साप्ताहिक स्कॅल्प मसाज केल्याने टाळू उत्तेजित होतो, कोंडा कमी होतो आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केसांची मुळे मजबूत होतात. स्कॅल्प मसाज केल्याने चांगली झोप येते आणि तणाव कमी होतो जो केसांच्या चांगल्या वाढीसाठी अनुकूल असतो.
४ ) केसांना कंडिशन करणे .

सौम्य शैम्पूने केस धुवा आणि केस आणि टाळू स्वच्छ करण्यासाठी खूप गरम पाणी वापरणे टाळा. आयुर्वेदात थंड किंवा कोमट पाण्याची शिफारस केली आहे. तुमचे केस रेशमी आणि मजबूत बनवण्यासाठी, मेथी, दही, त्रिफळा आणि हिबिस्कस यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या हेअर मास्कने दर आठवड्याला केसांना कंडिशन करा.
केसांसाठी कंडीशनर वापरा. रासायनिकदृष्ट्या हानिकारक असलेले उत्पादने टाळा.
५ ) तुमच्या केसांचे संरक्षण करा
जेव्हाही तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमच्या केसांचे संरक्षण करण्याचे नेहमी लक्षात ठेवा. छत्री, टोपी, स्कार्फ हे केसांना उन्हापासून वाचवण्याचे सोपे उपाय आहेत. केसांवर उष्णता आणि रासायनिक उपचार टाळा कारण ते केसांच्या क्यूटिकलला नुकसान पोहोचवू शकतात.
६ ) औषधोपचार
आयुर्वेदातही केसांना नियमितपणे पेस्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. पेस्ट लावल्याने केस मजबूत होतात आणि त्यांची वाढ गतिमान होते. यासाठी तुम्ही ब्राह्मी, भृंगराज, आवळा, शिककाई, मुलतानी माती, आणि बेसन इत्यादीपासून बनवलेली पेस्ट वापरू शकता. तुम्ही त्यांची पावडर घ्या, नंतर त्यात खोबरेल तेल घाला. ही पेस्ट केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा. अर्ध्या तासानंतर केस चांगले धुवा. तुम्हाला हवे असल्यास केस धुण्यासाठी तुम्ही कोणताही सौम्य शैम्पू वापरू शकता. पेस्ट लावल्याने केसांची चमक वाढते. तसेच केस मऊ आणि कोमल होतात. नियमितपणे पेस्ट लावल्याने केस धूळ, माती आणि सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या नुकसानीपासूनही सुरक्षित राहतात. तुमच्या केसांना सूर्यप्रकाश आणि धूळ यापासून वाचवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी पेस्ट लावावी
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा : जीवनशैली
जरी केस गळणे ही एक सामान्य समस्या असली तरी, त्या समस्या आपण योग्य काळजी घेतल्यास आणि उपाययोजना केल्यास, आपल्याला यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. आहार, मानसिक ताण नियंत्रण, आणि योग्य देखभाल हे सर्व केस गळती कमी करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. केस गळण्याची समस्या गंभीर वाटल्यास, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकते.