Skip to content

उचकी (Hiccups) थांबवण्यासाठी पाच सोपे घरगुती उपाय

March 13, 2025
उचकी लागणे .

उचकी (Hiccups) थांबवण्यासाठी सोपे घरगुती उपाय :

उचकी लागणे .
उचकी का लागते ?

उचकी लागली की आपल्या आजूबाजूची माणसं लगेच म्हणतात, ‘कोणीतरी आपली आठवण काढली वाटतं?’

आणि मग “मला लागली….कुणाची… उचकी ….!! ” हे गाणं पटकन तोंडात येतं..उचक्या लागल्यावर लोक कुणीतरी आठवण काढत असल्याचा तर्क देतात. पण scientifically असं काही नसतं.


आपणही आपल्या जवळच्य़ा कोणीतरी आठवण काढली असणार …..!! असं म्हणतो आणि पाणी पितो नंतर… थोड्या वेळाने उचकी आपोआप थांबते. काही जणांची उचकी पाणी न पिताही जशी येते तशी लगेचच थांबते. अनेकदा दिर्घ श्वास घेतल्यावर तर कधी साखर खाऊन ही उचकी थांबवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर काही वेळा बरेच प्रयत्न करुनही ही उचकी थांबत नाही. आता …उचकी येते म्हणजे नेमके काय होते…?
खरं तर..उचकी येणं फारच कॉमन आहे. सामान्यपणे पाणी प्यायल्यावर उचकी निघूनही जाते. पण काही लोकांसाठी सामान्य उचकी मोठी समस्या उभी करते. एकदा त्यांना उचक्या सुरू झाल्या तर थांबायचं नावच घेत नाहीत.

कधी कधी काही सेकंदात किंवा मिनिटांत उचकी येणे थांबते, तर कधी कधी बराच काळ त्रास होऊ शकतो.
उचकी का लागते? किंवा उचकी लागण्या मागची कारणं काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. उचकी लागल्यावर घरगुती उपाय फार महत्वाचे ठरू शकतात. अशावेळी नेमकं काय करावं?

उचकी लागते म्हणजे नक्की काय होत असते…?

उचकी (Hiccups) थांबवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

छातीच्या पिंजऱ्यात विभाजक पडदा (डायफ्रॅम) असतो. ( वरील चित्र पहा .) तो स्नायूंचा बनलेला असतो. कधी कधी आकस्मिकपणे या स्नायूंचे आकुंचन होते. डायफ्रॅमच्या आकुंचनामुळे फुफ्फुसातील हवा श्‍वासनलिकेतून बाहेर टाकली जाते, परंतु स्वरयंत्रणेतील पट्ट्या जवळ असल्यामुळे मोठ्याने आवाज होतो. यालाच आपण उचकी (Hiccups)लागली असे म्हणतो .

उचकी का लागते.. ? जाणून घेऊया याचे कारणे.

✓घाईघाईत जेवण करणे किंवा अती जलद गतीने खाणे.
✓अती तिखट खाणे, त्याची गरळ तोंडत येणे.

✓अन्ननलिका किंवा घश्याच्या आतील भागातील सूज झाल्यास उचकी लागते .

✓घाईगडबडीत एकदम जास्त पाणी पिणे.
✓अति थंड किंवा गरम पदार्थ सेवन करणे.

जर तुम्हाला सतत अनेक तास उचकी येत असेल किंवा अनेक दिवसांपासून अधूनमधून उचकी तुम्हाला त्रास देत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

उचकी (Hiccups) थांबवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

उचकी (Hiccups) थांबवण्यासाठी सोपे घरगुती उपाय
उचकी (Hiccups) थांबवण्यासाठी सोपे घरगुती उपाय
  • उचकी लागल्यावर लगेच थंड किंवा कोमट पाणी हळूहळू प्या. यामुळे डायफ्राम शांत होतो आणि उचकी थांबते. विशेषतः थंड पाणी घशाच्या स्नायूंना आराम देते, ज्यामुळे उचकी थांबण्यास मदत होते.
    • काही सेकंद श्वास रोखल्याने शरीरातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते, ज्यामुळे डायफ्रामवरील ताण कमी होतो. हा उपाय दीर्घकालीन उचकीसाठी खूप प्रभावी ठरतो.

*उचकी दूर करण्यासाठी ताज्या आल्याचा एक छोटा तुकडा घ्या. आल्याचा तुकडा चगळत रहा ,उचकी कमी होईल.

✓दीर्घ श्वास घेऊन थोडावेळ रोखून ठेवावा, जेणेकरून फुफ्फुसात हवा भरली जाईल व तत्काळ उचकी बंद होईल.

✓खडी साखर असेल तर चावून खावी, नंतर बसून पाणी प्यावे.

✓साखर आणि थोडेसे मीठ घालून पाणी प्यावे. तरीही जात नसेल तर कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करणे.

✓थोडेसे पाण्यात सुंठ उगाळून हुंगल्याने उचकी थांबते.
✓पेटलेल्या कोळशावर कापूर टाकून हुंगल्याने उचकी थांबते.

✓सूर्यनमस्कार आणि प्राणायाम देखील उचकीमध्ये आराम देऊ शकतात. त्यामुळे जेव्हा उचकी येते तेव्हा तुम्ही हे देखील करू शकता.

योग आणि व्यायाम

घरगुती उपयांनी उचकी थांबत नसेल तर…

मात्र, असे वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. यावर घरगुती उपाय काम करणार नाहीत. तुम्हाला नेहमी उचकी लागत असेल तर अस्थमा, न्युमोनिया किंवा श्वासासंबंधी आजार असू शकतात.

अनेकदा हृदयामध्ये काही बिघाड झाला असेल तरी उचकी लागू शकते. पोटावर सुज येणं, गॅस होणे, हाइटस हार्निया यामुळे देखील उचकीची समस्या सुरू होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

टीप: वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावं.