Skip to content

अपचन |Indigestion l आपणही या समस्येने ग्रस्त आहात का ?

March 8, 2025

अपचन (Indigestion)

अपचन (Indigestion): कारणे, लक्षणे आणि उपाय

अपचन (Indigestion): कारणे, लक्षणे आणि उपाय

अन्नाचे व्यवस्थित पचन न झाल्याने जे विकार किंवा आजार होतो त्यास ‘ अपचन ‘ असे म्हणतात. अपचन ल डिस्पेप्सिया (Dyspepsiahttps://en.m.wikipedia.org/wiki/Indigestion) असेही म्हणतात.
अपचन एक सामान्य आरोग्य समस्या आहे . आपल्या पैकी प्रत्येकाला आयुष्यात कधीना कधी या त्रासाला सामोरे जावं लागते . अपचन हे पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहे, ज्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते , विनाकारण त्रास होऊ शकतो . तर घरगुती उपायhernia www.ghargutiupay.com (ghargutiupay) या लेखात आपण अपचन होण्याची कारणे, त्याची लक्षणे आणि त्यावर उपाय याबद्दल माहिती घेऊ.

१) अपचनाची होण्याची प्रमुख कारणे:
अपचन (Indigestion) हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. अपचन हे प्रामुख्याने आहाराशी संबंधित असते तर काही वेळा आरोग्याच्या इतर समस्यांमुळेही अपचन होऊ शकते. येथे काही प्रमुख कारणे दिली आहेत:

अ) अयोग्य आहार पद्धत (Unhealthy Diet)
खाण्याचे अतिरिक्त प्रमाण म्हणजेच आपल्याला जेवढी भूक आहे त्यापेक्षा अधिक खाणे…आणि मग कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्रास होऊ शकतो..म्हणून जेवढं भूक आहे त्यापेक्षा थोडे कमीच जेवलेलं बर…किंवा नियमित वेळी जेवण न करता कधीही खाणे हेही अपचनाचे कारण बनू शकते. तसेच अतिशय तेलकट, मसालेदार किंवा जंक फूड खाणे, खूप जास्त प्रमाणात कॅफेइनयुक्त पेये (चहा, कॉफी) किंवा मद्यपान करणे यामुळे अपचन होऊ शकते. 

आ)  ताण आणि चिंता (Stress and Anxiety) अपचन
तणावामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, त्यामुळे पचन प्रक्रिया मंद होऊ शकते आणि अपचानाची समस्या निर्माण होऊ शकते.
          मानसिक ताण आणि चिंता यामुळे पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो.

इ) आरोग्य समस्या (Health Conditions) अपचन

काही आरोग्य समस्या जसे की आतड्याचे अल्सर, गॅस्ट्रटिस (जठराची सूज), गॅलस्टोन (पित्ताशयात दगड), किंवा ऍसिड रिफ्लक्स (आम्लपित्त) यामुळेही अपचन होऊ शकते. तसेच, काही औषधे, विशेषत: वेदनाशामक औषधे, यामुळेही अपचन होऊ शकते.

ई) अनियमित जीवनशैली (Lifestyle Factors)

२) अपचनाची लक्षणे (Symptoms of Indigestion)

अपचनाची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असू शकतात. काही लोकांचा कोटा मजबूत आहे असे म्हणतात, त्यांना अपचन होण्याची शक्यता कमीच असते,परंतु काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
अ). पोट फुगणे (Bloating) अनियमित जीवनशैली म्हणजेच – अवेळी झोपणे, व्यायामाचा अभाव आणि धूम्रपान यामुळेही अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते.

अपचन झाल्यास पोट कायम फुगल्यासारखे वाटते आणि अस्वस्थता निर्माण होते. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वारंवार डकार येऊ शकतात. गॅसेस चा त्रास होतो.
आ). पोटात जळजळ (Burning Sensation in Stomach)

अपचन झाल्यास पोटात जळजळ किंवा आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. कधी कधी ही जळजळ छाती पर्यंतही जाऊ शकते, त्याला “हार्टबर्न” असे म्हणतात.

इ). मळमळ आणि उलट्या (Nausea and Vomiting)
अपचानामुळे छातीत जळजळ होते.काही वेळा अपचनामुळे मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात. हे लक्षण विशेषत: जेवणानंतर दिसून येते.

ई). पोटदुखी (Stomach Pain)
तीव्र ओटीपोटात वेदना पचन संस्थेवर परिणाम करणाऱ्या रोगांमुळे देखील होऊ शकते. खाल्ल्यानंतर ओटीपोटात वेदना होऊ शकते.अपचन झाल्यास पोटात दुखणे किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. हे दु:ख सामान्यत: पोटाच्या वरच्या भागात होते.

अपचन

उ). आतड्याचे अडथळे (Irregular Bowel Movements)

अपचनामुळे आतड्याचे नियमित कार्य बिघडू शकते, ज्यामुळे अतिसार किंवा कब्ज यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

३) अपचनावर  घरगुती उपाय ( Home Remedies for Indigestion)

अपचन ही समस्या सहसा गंभीर नसते आणि काही सोप्या घरगुती उपायांनी ती सुधारता येऊ शकते. येथे काही प्रभावी घरगुती उपाय दिले आहेत:

अ). आहारात बदल (Dietary Changes)
जर तुम्हाला अपचन चा त्रास असेल तर प्रथम खाण्याचा वेळ निश्चित करावा लागेल.अपचन टाळण्यासाठी आपल्या आहारात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसभरात थोडेथोडे खावे जेणेकरून पोटावर ताण पडणार नाही. तेलकट, मसालेदार आणि जंक फूड टाळा. त्याऐवजी फायबरयुक्त आहार, ताजी भाज्या आणि फळे खाण्याचा प्रयत्न करा. तसेच, खाण्याचे छोटे छोटे तुकडे करून खा म्हणजेच जास्त चाऊन खावे आणि जेवल्यानंतर लगेच झोपू नका. थोडे का होईना २०-२५ पावले चालवीत .

आ). ताण कमी करणे (Stress Management)

ताण आणि चिंता कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा प्राणायाम करा. नियमित व्यायाम करणे हे देखील ताण कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

अपचन

इ ). घरगुती उपाय (Home Remedies)
1)पोटदुखीच्या काळात दही लाभदायक ठरते. दही हे प्रोबायोटिक मानले जाते. दह्यामध्ये मेथ्या भिजत घालून काही तासांनी खाल्ल्यानेही पोटदुखी कमी होते.
2)अजवाइन, जिरे, सौंफ आणि आले यासारख्या मसाल्यांचा वापर करून चहा तयार करून प्या. हे पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करते. तसेच, एक चमचा मध आणि आंब्याचा रस मिसळून घ्या, यामुळे अपचनाची समस्या कमी होण्यास मदत होईल

ई. औषधी उपचार (Medications)

जर अपचनाची समस्या गंभीर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत. अँटासिड्स, एच२ ब्लॉकर्स किंवा प्रोटॉन पंप इन्हिबिटर्स यासारख्या औषधांद्वारे अपचनाची समस्या नियंत्रित करता येते.

उ. जीवनशैलीत सुधारणा (Lifestyle Modifications)
पोटाचे दुखणे कमी करण्यासाठी थोडा फिरण्यावर भर द्यावा. गार्डनमध्ये किंवा परिसरात फिरायला जावे.
नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि धूम्रपान सोडणे यामुळे अपचनाची समस्या कमी होऊ शकते. तसेच, जेवणानंतर लगेच झोपू नका आणि खाण्याचे नियमित वेळापत्रक ठेवा.
बाहेरच्या आणि उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे  टाळा
शक्यतो घरातील अन्न खाण्यावरच भर दिला पाहिजे आणि जर बाहेर जेवायचे असेल तर त्या हॉटेलची स्वच्छता आणि परिसर पाहणे गरजेचे आहे. तसेच बाहेरही मर्यादित प्रमाणात जेवावे, जेणेकरून पचनशक्ती बिघडणार नाही. जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे हे प्राथमिक कर्तव्य आहे. अस्वच्छ हातामुळे संसर्गाची भीती असते

योग आणि व्यायाम

जर अपचना ची समस्या वारंवार होत असेल किंवा गंभीर असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घेऊन आपण आपल्या पचन संस्थेला निरोगी ठेवू शकतो आणि अपचनासारख्या समस्यांपासून दूर राहू शकतो.